दैनिक गोमन्तक डिजिटल
सफरचंदामध्ये 'पेक्टिन' नावाचे विद्राव्य फायबर (Soluble Fiber) असते, जे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. तसेच यातील अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांचे आरोग्य उत्तम ठेवतात.
डाळिंब हे हृदयासाठी अमृत मानले जाते. यात मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रक्तवाहिन्यांमध्ये फॅट जमा होण्यापासून रोखतात आणि शरीरातील रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारतात.
केळीमध्ये 'पोटॅशियम'चे प्रमाण भरपूर असते. पोटॅशियम शरीरातील सोडियमचे प्रमाण नियंत्रित ठेवून रक्तदाब (Blood Pressure) नॉर्मल ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयावर ताण पडत नाही.
पपईमध्ये व्हिटॅमिन-सी, बीटा-कॅरोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. हे घटक रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होण्यापासून रोखतात आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी करतात.
स्ट्रॉबेरी, जांभूळ किंवा ब्ल्यूबेरी यांसारख्या फळांमध्ये 'अँथॉसायनिन' नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारतात, जळजळ (Inflammation) कमी करतात आणि हृदयाचे स्नायू मजबूत करतात.
लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन-सी आणि पोटॅशियम भरपूर असते. ही फळे रक्तवाहिन्या लवचिक ठेवतात आणि हाय ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास अत्यंत फायदेशीर ठरतात.
पेरूमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण उत्तम असते. हे फळ रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास थेट मदत करते.