Manish Jadhav
दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 10 ते 15 मिनिटे तुमच्या वेगाने दोरीच्या उड्या मारा. हे पूर्ण शरीराचे वर्कआउट असून यामुळे पोटाची आणि मांड्यांची चरबी वेगाने कमी होते.
दररोज 30 ते 40 मिनिटे वेगाने चाला किंवा 15 ते 20 मिनिटे हलके पळा. हृदय निरोगी राहते आणि दैनंदिन कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
एकाच जागी उभे राहून हात आणि पाय पसरवून उड्या मारा. 30 सेकंदांचे 3 ते 4 संच (Sets) करा. यासाठी कोणत्याही साहित्याची गरज नसते आणि घरच्या घरी भरपूर फॅट बर्न होते.
जिममधील साधी सायकल असो वा रस्त्यावर चालवणारी, दररोज 20 ते 30 मिनिटे सायकल चालवा. सांध्यांवर (गुडघ्यांवर) ताण न पडता मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी हे उत्तम आहे.
घरातील किंवा सोसायटीतील जिने 10 ते 15 मिनिटे सलग चढा आणि उतरा. पाय मजबूत होतात आणि पायांच्या स्नायूंमधील चरबी लवकर विरघळते.
आठवड्यातून 2 ते 3 वेळा अर्धा तास पोहण्याचा सराव करा. संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि अतिशय वेगाने कॅलरीज बर्न होतात.
एकाच जागी उभे राहून तुमचे गुडघे छातीपर्यंत उंच आणा आणि वेगाने पळा. पोटाची खालची चरबी कमी करण्यासाठी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी हे अतिशय प्रभावी आहे.