Sameer Amunekar
मार्चमध्ये ऋषिकेशचे हवामान अतिशय आल्हाददायक असते. येथे तुम्ही कुटुंबासोबत गंगा आरतीचा अनुभव घेऊ शकता. तसेच, ज्यांना साहसी पर्यटनाची आवड आहे त्यांच्यासाठी रिव्हर राफ्टिंग आणि कॅम्पिंगचे हे उत्तम दिवस असतात.
दक्षिण भारतातील हे ठिकाण चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. मार्चमध्ये येथील निसर्ग हिरवागार असतो आणि वातावरणही थंड असते.
महाराष्ट्रातील पर्यटकांच्या पसंतीचे हे टॉपचे ठिकाण आहे. मार्च महिन्यात येथे स्ट्रॉबेरीचा हंगाम ऐन भरात असतो. कुटुंबासोबत मॅप्रो गार्डन, वेण्णा लेकवर बोटिंग आणि विविध व्ह्यू पॉइंट्सचा आनंद घेता येतो.
जर तुम्हाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ट्रिप करायची असेल, तर मार्चमध्ये मथुरा-वृंदावनला नक्की जा. विशेषतः होळीच्या काळात येथील उत्सव जगभरात प्रसिद्ध असतो.
ईशान्य भारतातील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी मार्च महिना योग्य आहे. या काळात येथील रस्ते खुले असतात आणि फुलांच्या बागा फुललेल्या दिसतात. गंगटोक, त्सोम्गो लेक आणि नथुला पास यांसारख्या ठिकाणांना तुम्ही कुटुंबासह भेट देऊ शकता.
कुर्गला 'भारताचे स्कॉटलंड' म्हटले जाते. मार्चमध्ये येथील कॉफीच्या बागांना फुले येतात, ज्यामुळे संपूर्ण परिसर सुगंधाने दरवळतो.
मार्चमध्ये काश्मीरमध्ये हिवाळा संपत आलेला असतो आणि वसंत ऋतूची चाहूल लागलेली असते. गुलमर्ग आणि पहलगाममध्ये तुम्हाला थोडा बर्फही पाहायला मिळू शकतो.