Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 5 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सामना झाला.
कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने 243 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
भारताच्या या विजयात रविंद्र जडेजाने महत्त्वाचा वाटा उचलला, त्याने 33 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.
त्याची ही कामगिरी वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय फिरकीपटूने एका डावात केलेली दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
वर्ल्डकपमध्ये एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणाऱ्या भारतीय फिरकीपटूंमध्ये अव्वल क्रमांकावर युवराज सिंग आहे.
युवराजने 2011 वर्ल्डकपमध्ये बंगळुरूला आयर्लंडविरुद्ध 31 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच युवराजने 2003 वर्ल्डकपमध्ये नामीबियाविरुद्ध 6 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. ही आता वर्ल्डकपमध्ये भारतीय फिरकीपटूने नोंदवलेली तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी ठरली आहे.
या विक्रमाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आर अश्विन आहे. त्याने पर्थमध्ये 2015 वर्ल्डकप स्पर्धेत युएईविरुद्ध 25 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या.