Pranali Kodre
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जातो. त्याने आत्तपर्यंत अनेक विक्रम केले आहेत, यातील 10 खास विक्रमांबद्दल जाणून घेऊ.
विराट हा सचिन तेंडुलकर समवेत वनडेत सर्वाधिक 49 शतके करणारा क्रिकेटपटू आहे.
विराट वनडेमध्ये सर्वात जलद 8 हजार, 9 हजार, 10 हजार, 11 हजार, 12 हजार, 13 हजार धावा करणारा खेळाडू आहे.
विराटने वनडेत धावांचा पाठलाग करता सर्वाधिक 27 शतके केली आहेत.
विराटने सर्वाधिक 8 वेळा एका वर्षात वनडेत 1000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 79 शतके करणारा सचिन तेंडुलकरनंतरचा दुसराच खेळाडू आहे. सचिनने 100 शतके केली आहेत.
विराटने भारताकडून सर्वाधिक 68 कसोटीत नेतृत्व केले असून त्यानेच सर्वाधिक 40 विजय देखील मिळवले आहेत.
विराट वनडे वर्ल्डकपमधील पहिलाच सामना खेळताना शतक करणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे. त्याने 2011 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशविरुद्ध शतक केले होते.
विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 26 हजार धावांचा टप्पा पार करणारा सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा आणि रिकी पाँटिंग यांच्यानंतरचा चौथाच फलंदाज आहे.
विराट वनडेत सर्वाधिकवेळा 50 धावांचा टप्पा पार करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याने 119 वेळा 50 धावा पार केल्या आहेत, तर सचिनने 145 वेळा 50 धावांचा टप्पा पार केला आहे.