दैनिक गोमन्तक डिजिटल
तुमच्या घरात किंवा इमारतीत पायऱ्या असतील, तर रोज १० ते १५ मिनिटे पायऱ्या चढणे आणि उतरणे हा उत्तम व्यायाम ठरू शकतो. यामुळे पायांचे स्नायू मजबूत होतात आणि स्टॅमिना वाढतो.
हा एक सर्वोत्तम कार्डिओ (Cardio) व्यायाम आहे. दोरीवरील उड्या मारल्याने संपूर्ण शरीराची हालचाल होते, वेगाने कॅलरीज बर्न होतात आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
पुश-अप्स हा छाती, खांदे आणि हातांचे स्नायू बळकट करण्यासाठी अत्यंत प्रभावी व्यायाम आहे. सुरुवातीला जमत नसेल, तर तुम्ही गुडघे जमिनीवर टेकवून किंवा भिंतीचा आधार घेऊन (Wall Push-ups) करू शकता.
मांड्या आणि नितंभाचे (Glutes) स्नायू मजबूत करण्यासाठी स्क्वॅट्स सर्वोत्तम आहेत. यामुळे शरीराचा खालचा भाग मजबूत होतो आणि रोजच्या हालचाली सुलभ होतात.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि 'कोअर' (Core) स्नायू बळकट करण्यासाठी प्लँक करावा. जमिनीवर कोपरांच्या आणि पायाच्या बोटांच्या बळावर शरीर सरळ रेषेत धरून ठेवणे, हा शरीराला कमालीची ताकद देणारा व्यायाम आहे.
घराबाहेर जाणे शक्य नसेल, तर घरातल्या घरात एकाच जागेवर उभे राहून धावण्याचा सराव करा. यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्ताभिसरण सुधारते.
सूर्यनमस्कार हा एक परिपूर्ण व्यायाम (Full Body Workout) मानला जातो. रोज केवळ १० ते १२ सूर्यनमस्कार घातल्याने शरीराची लवचिकता वाढते, पचनक्रिया सुधारते आणि मानसिक शांतता मिळते.