Sameer Amunekar
बटरफ्लाय पार्क हे निसर्ग आणि जैवविविधतेप्रती प्रेम निर्माण करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. लहान मुलांना फुलपाखरांच्या अद्भुत दुनियेत घेऊन जाण्यासाठी आणि त्यांना निसर्गाविषयी शिकवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.
बोंडला अभयारण्य हे गोव्यातील सर्वात सुंदर आणि शांत ठिकाणांपैकी एक आहे. येथे लहान मुलांना वन्यजीव आणि निसर्गाविषयी शिकता येते, तसेच संपूर्ण कुटुंबासाठी ही एक आनंददायक सहल ठरू शकते.
गोव्याला गेल्यावर आपल्या कुटुंबासोबत पणजी येथील गोवा सायन्स सेंटर आणि प्लॅनेटेरियमला नक्की भेट द्या आणि विज्ञानाचा अद्भुत प्रवास अनुभवता येणार.
मुलांना नैसर्गिक शेतीविषयी माहिती देण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीसाठी आवड असणाऱ्यांसाठी हे सुंदर ठिकाण. येथे जाण्यासाठी तुम्हाला सत्तरी येथं जानं लागेल.
गोव्याला भेट दिल्यावर मिनी इंडिया पार्कला अवश्य भेट द्या. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांव्यतिरिक्त ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सफर येथे करता येतो. फॅमिली आणि ग्रुप ट्रीपसाठी उत्तम पर्याय. हे ठिकाण लोटली येथे आहे.
गोव्याला गेल्यावर आग्वाद आणि शापोरा किल्ल्यांना नक्की भेट द्या आणि गोव्याच्या ऐतिहासिक ठेव्याचा आनंद घ्या. हे किल्ले इतिहास आणि संस्कृतीप्रेमींसाठी विशेष आकर्षण आहे.