Sameer Amunekar
पावसाळा हा निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी एक अत्यंत सुंदर काळ असतो. धबधबे, हिरवळ, धुके आणि गारवा यामुळे ट्रिप अजूनच खास बनते.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला कोकणातील आंबोली घाट म्हणजे पावसाळ्यातील निसर्गप्रेमींसाठी एक स्वर्गच. मुसळधार पावसात दाट धुके, हिरव्यागार डोंगररांगा, आणि उंचावरून कोसळणारे धबधबे पाहताना मन हरखून जातं.
दूधसागर धबधबा हा भारतातील सर्वात भव्य आणि प्रसिद्ध धबधब्यांपैकी एक आहे. गोव्यात असलेला हा प्रसिध्द धबधबा विदेशातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात.
पावसाळ्यात जर तुम्हाला निसर्गाच्या कुशीत शांतता, गारवा आणि सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर कर्नाटकातील चिकमगलूर हा एक परिपूर्ण पर्याय ठरतो. पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं हे ठिकाण म्हणजे कॉफीच्या मळ्यांचं माहेरघर असं म्हटलं जातं.
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन असून, पावसाळ्यात ते अगदी स्वर्गासारखं दिसतं. धुके, पावसाच्या सरी, हिरवळ, आणि थंड हवामान यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमी, कपल्स आणि फॅमिली ट्रिपसाठी खास बेस्ट आहे.
माथेरान महाराष्ट्रातील निसर्गाने नटलेल हिल स्टेशन असून पावसाळ्यात ते एकदम जादुई रूप घेतं. धुक्याची चादर, दाट जंगल, आणि झरझर वाहणारे छोटे धबधबे यामुळे माथेरानमध्ये निसर्गरम्य, थंड वातावरण पाहायला मिळतं.