Akshata Chhatre
असं म्हणतात गोव्यात भरपूर पाऊस असतो, पण पावसाळ्यात गोवा हा ऑप्शन चांगला आहे का? होय! गर्दीपासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात शांतता अनुभवण्यासाठी गोव्याला भेट द्या.
पावसाळा म्हणजे पर्यटनाचा ऑफ-सीझन, यामुळे समुद्रकिनारे शांत असतात आणि स्वतःसाठी वेळ देता येतो.
पावसात समुद्रकिनारे अधिक नाट्यमय आणि हिरवेगार दिसतात. अशी सुंदर दृश्य कॅमेऱ्याचा खास क्षण बनू शकतात.
ओल्या मातीचा सुगंध, थंड वारा, पावसाचे थेंब आणि लाटांचा आवाज एक समाधानी अनुभव देऊन जातो.
जर तुम्हाला शांतता, निसर्ग आणि मनःशांती हवी असेल, तर पावसाळ्यातला गोवा तुमच्यासाठी परिपूर्ण ठिकाण आहे.
हॉटेल्सचे दर कमी, प्रवास स्वस्त असल्याने ही ट्रिप खर्च कमी आणि मजा जास्त अशी होते.
गोव्यात भरपूर पाऊस पडतो, त्यामुळे समुद्रात पोहणे हा एक मोठा धोका असू शकतो. यावेळी अनेक बीच शॅक्स बंद असतात, पाऊस जोरदार असतो त्यामुळे वेळीच तयारी करून जा.