Sameer Amunekar
प्रेमविवाहात दोघेही एकमेकांना आधीच चांगले ओळखत असल्यामुळे त्यांच्यातील समजूत अधिक घट्ट असते.
प्रेमसंबंधातून विवाहात रूपांतर झाल्यामुळे विश्वासाचा पाया मजबूत असतो, जो कोणत्याही नात्यासाठी महत्त्वाचा आहे.
नवीन ओळख किंवा समजून घेण्याचा काळ नसल्याने, अनावश्यक तणाव किंवा गैरसमज कमी होतात.
एकमेकांना आधीपासून ओळखल्यामुळे मनमोकळेपणाने संवाद साधता येतो, जे नातं मजबूत करतं.
ज्या प्रेमात स्थिरता व परस्पर आदर असतो, त्या नात्याला अखेर दोन्ही घरच्यांचा स्वीकार मिळतोच, फक्त थोडं संयम लागतं.
प्रेमविवाहात सहसा दोघांच्या स्वभावात किंवा आवडीनिवडीत साम्य असतं, त्यामुळे आयुष्य सोपं होतं.
भक्कम मैत्रीवर व प्रेमावर आधारित नातं टिकण्याची शक्यता अधिक असते, कारण त्यात जबरदस्तीपेक्षा परस्पर समज व स्वीकार महत्त्वाचा ठरतो.