Sameer Panditrao
मौन म्हणजे काही वेळ स्वतःशी राहणे, म्हणजे मानसिक विश्रांती घेणे.
रोज ३० मिनिटे मौन राहिल्याने मेंदूतील ताण-तणाव कमी होतो.
मौनामुळे मेंदूला आराम मिळतो. त्यामुळे एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते.
सतत बोलण्याने थकवा येतो, पण मौन आचरण केल्याने मनाला स्थिरता आणि शांतता मिळते.
मौनामुळे आपण विचारपूर्वक बोलायला शिकतो. त्यामुळे आपले बोलणे प्रभावी होते.
मौनामुळे नवीन कल्पना सुचतात. लेखन, कला, संगीत किंवा कामात सर्जनशीलता खुलून येते.
दररोज मौन पाळल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो, झोप चांगली लागते आणि शरीर-मन ताजेतवाने राहते.