दैनिक गोमन्तक
गॉसिप करणाऱ्या इतर लोकांना चांगले मानले जात नाही. मात्र कमी जास्त प्रमाणात प्रत्येकजण आपापल्या जवळच्या व्यक्तींबरोबर गॉसिप करत असतात.
गॉसिप करण्याचे काही फायदेदेखील आहेत, हे तुम्हाला माहित आहे का ?
कोणाबरोबर गोष्टी शेअर करायच्या आणि कोणाबरोबर नाही याची तुम्हाला समज येते.
तुमचा मनावरील तणाव कमी होतो. याबरोबरच तुम्हाला काही गोष्टी खटकत असतील, आवडत नसतील, ज्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होत असेल अशा गोष्टी गॉसिपमुळे बाहेर येतात.
ज्या व्यक्तींना तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी किंवा इतर कोणाबद्दल सांगत असाल तर त्या व्यक्तीबरोबर तुमची जवळीक वाढते.
ज्या चूकीमुळे एखादा इतर व्यक्ती गॉसिपचे कारण बनला आहे, त्या गोष्टी तुम्हाला समजल्या तर तुम्ही पुन्हा त्याच चूका करणार नाही.
तुम्हाला मानसिक आधार मिळतो.