महागड्या ब्युटी पार्लरला म्हणा टाटा-बाय बाय! किचनमधली ही 'छोटी' गोष्ट करतेय 'मोठा' करिश्मा!

Manish Jadhav

पचनसंस्था मजबूत होते

वेलचीमधील पोषक घटक पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. रिकाम्या पोटी वेलची चावून खाल्ल्याने गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून सुटका मिळते.

cardamom | Dainik Gomantak

नैसर्गिक डिटॉक्स

वेलची शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि किडनीचे आरोग्यही उत्तम राहते.

cardamom | Dainik Gomantak

तोंडाची दुर्गंधी

वेलचीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. सकाळी वेलची खाल्ल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होते आणि दातांच्या आरोग्यात सुधारणा होते.

cardamom | Dainik Gomantak

रक्तदाब नियंत्रित राहतो

उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांसाठी वेलची फायदेशीर आहे. यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Cardamom | Dainik Gomantak

वजन कमी करण्यास उपयुक्त

वेलची मेटाबॉलिज्म (Metabolism) वाढवते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत वेलची खाल्ल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत होते.

cardamom | Dainik Gomantak

त्वचेसाठी वरदान

वेलची रक्तातील शुद्धीकरण करते, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि मुरुमांच्या (Pimples) समस्या कमी होण्यास मदत होते.

cardamom | Dainik Gomantak

तणाव आणि चिंता कमी करते

वेलचीचा सुगंध मनाला शांत करतो. सकाळी वेलची खाल्ल्याने मानसिक तणाव कमी होऊन मन प्रसन्न राहते, ज्यामुळे दिवसभर फ्रेश वाटते.

cardamom | Dainik Gomantak

Belapur Fort: नवी मुंबईचा 'रॉयल' वारसा अन् चिमाजी अप्पांचा 'तो' ऐतिहासिक विजय... 500 वर्षांचा बेलापूर किल्ल्याचा धगधगता इतिहास

आणखी बघा