Akshata Chhatre
उन्हाळ्याच्या दिवसांत भरपूर ताक प्यावं असं वाटतं का? हो तर आज त्याचे फायदे देखील पाहुयात, काही असे फायदा जे दूधही देऊ शकत नाही.
ताक पचनसंस्थेला मदत करते. हे दुधापेक्षा हलके असल्याने सहज पचते.
ताक पिल्याने शरीर थंड राहते व डिहायड्रेशन होत नाही.
ताकात नैसर्गिक प्रॉबायोटिक्स असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारतात.
ताक पिल्याने पोटातील जळजळ कमी होऊन पोटाला आराम मिळतो.
ताक कमी कॅलरीचे व फॅट कमी असलेले पेय आहे, जे वजन कमी करण्यासाठी उत्तम आहे.