Sameer Panditrao
उपवासाच्या पदार्थांमध्ये अनेकांचा मनापासून आवडणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा.
साबुदाणा कंदापासून तयार केला जातो, यात कार्बोहायड्रेट व प्रोटिन प्रचुर प्रमाणात असतात. त्यामुळे साबुदाण्याचे पोषणमूल्य खूप चांगले समजले जाते.
स्नायू बळकट करायचे आहेत, लहान मुलांचे वजन वाढण्यासाठी वा त्यांच्या विकासाला हातभार लागण्याकरता, शरीरात वीर्यवृद्धी होण्याकरता साबुदाणा उपयोगी ठरू शकतो.
साबुदाणा कच्चा भाजून केलेले पीठ, थालिपिठासाठी वा लहान मुलांच्या आहारासाठी वापरणे अत्यंत चांगले असते.
साबुदाण्याची खीर पचायला सोपी व शुक्रवर्धक असते.
साबुदाण्याच्या खिचडीऐवजी या गोष्टी उपवासादिवशी घेण्याचा प्रयत्न करा.
कफ प्रकृतीच्या व्यक्तीने साबुदाणा खाणे शक्यतो टाळावे.