Akshata Chhatre
आत्मविश्वासू असणे किंवा तसं बनणं हे सहज साध्य होत नाही. मात्र स्वतःवर विश्वास ठेवणे हेच जीवनात यश, ध्येय आणि आत्मसमाधान मिळवण्याचं खरं गमक असतं.
स्वतःविषयी शंका असणं साहजिक आहे, पण त्या शंका दूर सारून स्वतःबद्दल खात्री निर्माण करणं फार महत्त्वाचं आहे.
खरं तर, जेव्हा एखादं काम आपल्याला आवडतं, तेव्हा आपण त्यात चांगलं कामगिरी करतोच. आणि तीच गोष्ट करण्याची उत्सुकता आपल्याला त्या कामात अधिक परिपक्व बनवते.
इतर कोणतंही नवीन काम करताना तोच उत्साह ठेवला, तर थोड्याच वेळात आपल्याला त्यातही आत्मविश्वास वाटू लागतो. नकारात्मकता ही एक अशी गोष्ट आहे जी आत्मविश्वासावर परिणाम करते.
जेव्हा आपल्या मनात नकारात्मक विचार आणि असुरक्षितता भरते, तेव्हा आपण स्वतःला मागे ओढत राहतो.
जेव्हा आपण लोक काय विचार करतील यापेक्षा आपण काय अनुभवतो हे व्यक्त करू लागतो, तेव्हा खरा आत्मविश्वास विकसित होतो.