Sameer Amunekar
बीअर प्यायल्याने काही फायदे असू शकतात, पण त्याचे तोटेही महत्त्वाचे आहेत. योग्य प्रमाणात घेतली तर ती काही प्रमाणात उपयोगी ठरू शकते, पण अति झाल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
संशोधनानुसार, योग्य प्रमाणात बीअर पिण्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असतात, जे हृदयासाठी फायदेशीर ठरू शकतात.
बीअरमध्ये सिलिकॉन असतो, जो हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो. काही संशोधनानुसार, मध्यम प्रमाणात बीअर प्यायल्याने अल्झायमर होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
बीअरमध्ये व्हिटॅमिन B6, B12 आणि फॉलिक अॅसिड असते. यात पॉलिफेनॉल्स नावाचे अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीराला फायद्याचे ठरू शकतात.
संशोधनानुसार, मध्यम प्रमाणात बीअर प्यायल्याने किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होते, कारण ती नैसर्गिक मूत्रवर्धक आहे.
बीअरमध्ये भरपूर कॅलरी असतात. वारंवार सेवन केल्यास पोट सुटू शकते. अतिरिक्त चरबीमुळे मधुमेह आणि हृदयरोग होण्याचा धोका वाढतो.
जास्त प्रमाणात बीअर प्यायल्याने लिव्हरवर परिणाम होतो आणि फॅटी लिव्हर, सिरोसिससारख्या गंभीर समस्या होऊ शकतात.