ब्युटी सिक्रेट! कोरफडीच्या सालीपासून तयार करा नैसर्गिक क्लींजर; पार्लरसारखा ग्लो मिळवा अगदी मोफत

Sameer Amunekar

ब्युटी सिक्रेट

कोरफडीची साल फेकून देताय? थांबा! त्यापासून घरीच तयार करा नैसर्गिक क्लींजर आणि मिळवा पार्लरसारखा ग्लो अगदी मोफत.

Homemade natural cleanser from aloe vera peel | Dainik Gomantak

साल कचऱ्यात टाकू नका

कोरफडीच्या गराप्रमाणेच तिच्या सालीमध्येही अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात, जे त्वचेला आतून स्वच्छ करतात.

Homemade natural cleanser from aloe vera peel | Dainik Gomantak

असे बनवा क्लींजर

सर्वात आधी कोरफडीचे पान स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर सुरीच्या साहाय्याने त्याची हिरवी साल वेगळी करून मिक्सरमध्ये बारीक वाटून पेस्ट तयार करा.

Homemade natural cleanser from aloe vera peel | Dainik Gomantak

नॅचरल घटक

या सालीच्या पेस्टमध्ये एक चमचा गुलाब पाणी आणि अर्धा चमचा मध मिक्स करा. गुलाब पाणी त्वचेला हायड्रेट ठेवते तर मधामुळे त्वचा मऊ होते.

Homemade natural cleanser from aloe vera peel | Dainik Gomantak

चेहऱ्यावर असा करा मसाज

हे क्लींजर चेहऱ्यावर आणि गळ्यावर लावून हलक्या हाताने ५ मिनिटे मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील धुळीचे कण आणि मृत त्वचा (Dead Skin) निघून जाईल.

Homemade natural cleanser from aloe vera peel | Dainik Gomantak

पिंपल्स आणि टॅनिंग गायब

या घरगुती क्लींजरच्या नियमित वापराने चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स कमी होतात आणि उन्हामुळे झालेले टॅनिंग पूर्णपणे दूर होते.

Homemade natural cleanser from aloe vera peel | Dainik Gomantak

त्वचा चमकेल काचेसारखी

रासायनिक उत्पादनांना म्हणा बाय-बाय! आठवड्यातून ३ वेळा हा मोफत उपाय नक्की ट्राय करा. अशाच ब्युटी टिप्ससाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.

Homemade natural cleanser from aloe vera peel | Dainik Gomantak

घरीच फेशियल करून पार्लरसारखा चकाचक चेहरा मिळवण्याची सोपी पद्धत!

Skin Care | Dainik Gomantak
येथे क्लिक करा