Akshata Chhatre
दक्षिण गोव्यातील मडगावपासून फक्त १०९ किलोमीटरच्या अंतरावर एक सुंदर हिलस्टेशन आहे. गोव्यात असाल किंवा गोवा फिरायला जाण्याच्या तयारीत असाल तर या ठिकाणी नक्की जाऊन या.
तसं बघितलं तर उत्तर भारतात हिल स्टेशन्स भरपूर आहेत पण आज आपण गोव्याजवळील 'त्या' हिलस्टेशन बद्दल जाणून घेऊया.
आंबोली हिलस्टेशन हे कुठल्या स्वर्गापेक्षा कमी नाही. तुम्हाला जर का फिरायला आवडत असेल तर इथे नक्कीच जाऊन या.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग तालुक्यात असलेल्या आंबोली या ठिकाणी हे सुंदर हिलस्टेशन पाहायला मिळतं.
या उन्हाळ्याच्या सुट्टीत जर का कुठल्या नवीन जागेला भेट देण्याच्या विचारात असाल तर या हिलस्टेशनचा विचार केला जाऊ शकतो.
समुद्र किनाऱ्यापासून हे हिलस्टेशन ६९० मीटरच्या अंतरावर आहे.