Beach Safety Tips: बीचवर मोकळेपणाने फिरा, पण 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

Sameer Amunekar

सनस्क्रीन वापरा

समुद्रकिनारी तीव्र उन्हामुळे त्वचा जळू शकते. किमान SPF 30+ असलेला सनस्क्रीन लावा आणि दर २-३ तासांनी पुन्हा लावा.

Beach Safety Tips | Dainik Gomantak

योग्य कपडे घाला

हलके, आरामदायक आणि हवेशीर कपडे घाला. टोपी आणि सनग्लासेस घालून डोळ्यांचे आणि चेहऱ्याचे संरक्षण करा.

Beach Safety Tips | Dainik Gomantak

पाणी

उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे भरपूर पाणी प्या. नारळपाणी, लस्सी, ज्यूस किंवा इलेक्ट्रोलाइट्स घेतल्यास शरीर हायड्रेट राहील.

Beach Safety Tips | Dainik Gomantak

समुद्राच्या लाटांबद्दल माहिती

समुद्र शांत दिसला तरी अचानक मोठ्या लाटा येऊ शकतात. रेड फ्लॅग किंवा वॉर्निंग सिग्नल्स तपासा आणि सुरक्षित भागातच पोहायला जा.

Beach Safety Tips | Dainik Gomantak

पाण्यात उतरताना काळजी घ्या

खोल पाण्यात जाणे टाळा, विशेषतः जर तुम्हाला चांगले पोहता येत नसेल. स्थानिक सुरक्षा रक्षक असलेल्या भागातच पोहायला जा.

Beach Safety Tips | Dainik Gomantak

रात्रीच्या वेळी सावधगिरी बाळगा

काही समुद्रकिनारे रात्री धोकादायक असू शकतात. रात्री समुद्रात जाणे टाळा आणि सुरक्षित ठिकाणीच थांबा.

Beach Safety Tips | Dainik Gomantak
Aloe vera Benefits | Dainik Gomantak
त्वचेसाठी कोरफड फायदेशीर