Goa, Japanese Garden: लय खास हाय गोव्यातलं 'जापनीज गार्डन'; शानदार समुद्राचा नजारा...

Manish Jadhav

गोवा

गोव्याचं विलोभनीय निसर्ग सौंदर्य पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनासाठी खूप गोष्टी आहेत.

japanese garden in vasco

पर्यटकांचं आकर्षण

गोव्यातील जपानीज गार्डन हे येथील सौंदर्य आणि मनमोहक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. वास्को येथील डोंगरमाथ्यावर वसलेले हे गार्डन पर्यटकांना आकर्षित करतं. याठिकाणी स्थनिक तसेच विदेशी पर्यटक आवर्जून भेट देतात.

japanese garden in vasco | Dainik Gomantak

समुद्राचं विहंगम दृश्य

या जपानीज गार्डनमधून समुद्राचं विहंगमय दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. तसेच या ठिकाणी सूर्यास्त आणि सूर्योदय दोन्ही पाहायला मिळते.

japanese garden in vasco | Dainik Gomantak

लहान मुलांसाठी आकर्षण

जपानीज गार्डनमध्ये अनेक स्विंग आणि स्लाईड्स आहेत, त्यामुळे ते मुलांना आकर्षित करतं.

japanese garden in vasco | Dainik Gomantak

मुरगाव किल्ल्याचा परिसर

हे जपानीज गार्डन मुरगाव किल्ल्याच्या परिसरात असून वास्कोपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आहे.

japanese garden in vasco | Dainik Gomantak

रोइंग बोटीचा सुंदर नजारा

जपानीज गार्डनला जाण्यासाठी एक रमणीय पायवाट आहे. खाली खोल निळ्या समुद्रात जहाजे आणि रोइंग बोटींचा सुंदर नजारा देखील तुम्ही अनुभवू शकता.

japanese garden in vasco | Dainik Gomantak

शिव मंदिर!

जपानीज गार्डनला जाताना वाटेत एक छोटेसे शिवमंदिरही आहे, याठिकाणी देखील तुम्ही भेट देऊ शकता.

japanese garden in vasco | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी