Sameer Panditrao
उन्हाळ्यात नदीत पोहायला सर्वांना आवडते पण यासाठी जीव धोक्यात घालू नका!
उन्हाळ्यात तापमान वाढते, शरीराला थंडावा हवा असतो. गावाकडील लोक नदीत पोहण्याचा आनंद घेतात, पण…
दरवर्षी उन्हाळ्यात नदीत बुडाल्याच्या घटना वाढत आहेत.
नदीचे पाणी काही भागात खोल असते, प्रवाही वेगवान. बाहेरून शांत दिसणारी नदी आतून घातक असते.
गटाने पोहा, मदतीसाठी कोणी तरी जवळ असावा, नदीची खोली - प्रवाह आधी जाणून घ्या, नशेत किंवा अति उत्साहात पोहू नका.
लहान मुलं नदीजवळ गेल्यास सतत लक्ष ठेवा. मोबाईलमध्ये गुंतून दुर्लक्ष करू नका.
नदीत पोहणे म्हणजे आनंद, पण सुरक्षिततेची सोबत हवीच हे समजून घ्या!