Sameer Amunekar
बॅसिलिस्क सरडा पाण्यावर धावू शकतो, म्हणून त्याला “जिझस लिझर्ड” असेही म्हणतात. त्याच्या मागच्या पायांची खास रचना यासाठी कारणीभूत आहे.
हा सरडा प्रामुख्याने कोस्टा रिका, पनामा, निकाराग्वा, होंडुरास आणि आसपासच्या जंगलांमध्ये आढळतो.
बॅसिलिस्क सरड्यांना पाण्याजवळ राहायला आवडते. धोका जाणवला की तो थेट नदीत किंवा ओढ्यात धाव घेतो.
नर बॅसिलिस्कच्या डोक्यावर, पाठीवर आणि शेपटीवर मुकुटासारखा उंच कंगोरा असतो, त्यामुळे तो अतिशय वेगळा दिसतो.
हा सरडा वातावरणानुसार किंवा धोक्याच्या वेळी रंग थोडासा बदलू शकतो, ज्यामुळे तो शत्रूपासून लपतो.
बॅसिलिस्क सरडा कीटक, लहान मासे, बेडूक, फळे आणि पानं खातो. त्यामुळे तो सर्वभक्षी मानला जातो.
हा सरडा विषारी नाही आणि माणसांवर हल्ला करत नाही. तो अतिशय भित्रा असून धोका टाळण्यासाठी पळ काढतो.