Sameer Panditrao
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपुरीच्या उत्तरेस पसरलेली ऐतिहासिक त्र्यंबक डोंगररांग आजही भूतकाळाची साक्ष देते.
गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी काताळात कोरलेला हा किल्ला ‘बसगड’ किंवा ‘भास्करगड’ म्हणून ओळखला जातो.
इथला सर्पिलाकार जिना आणि सातवाहनकालीन पाण्याची टाकी किल्ल्याचे अतिप्राचीन अस्तित्व सिद्ध करतात.
इ.स. १३०८ पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या यादवांच्या अधिपत्याखाली होता.
बहामनी, निजामशाही, मोगल, शहाजी राजे, शिवराय आणि पेशवे — अनेक सत्तांचा साक्षीदार हा किल्ला आहे.
इ.स. १६७० मध्ये शिवाजी महाराजांचे पेशवा मोरोपंत पिंगळे यांनी किल्ला स्वराज्यात आणला.
पठारावरील पडक्या वास्तू, मंदिरांचे अवशेष, टाक्या आणि दगडात कोरलेला हनुमान इतिहास जिवंत करतात.
इतिहासात कमी उल्लेख असूनही, बसगड आजही साहस, स्थापत्य आणि संघर्षांची कहाणी सांगतो.