Pranali Kodre
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने 12 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधीस तिन्ही प्रकारातील संघासाठी नव्या कर्णधाराची घोषणा केली.
बांगलादेशच्या कसोटी, वनडे आणि टी20 संघाच्या नेतृत्वाची धूरा आता नजमूल हुसैन शांतो याच्याकडे सोपवण्यात आली आहे.
शांतोकडे सध्यातरी एक वर्षासाठी कर्णधारपद सोपवण्यात आल्याचे बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्ष नझमुल हसन यांनी माहिती दिली.
शांतोची गेल्याकाही वर्षातील कामगिरी शानदार राहिली आहे. दरम्यान, त्याच्याकडे कर्णधारपद सोपवून बांगलादेशने आता युवा खेळाडूंमध्ये अधिक लक्ष देत असल्याचे इशारा दिला आहे.
नझमुल हसन यांनी म्हटले की कर्णधारपदासाठी शाकिब अल हसन पहिली पसंती होता, परंतु त्याच्या डोळ्यात असलेल्या समस्येबद्दल त्याने कळवल्यानंतर बोर्डाने शांतोकडे ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
शांतोने यापूर्वी 11 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये बांगलादेशचे प्रभारी नेतृत्व केले असून 3 विजय आणि 7 पराभव स्विकारले आहेत. पण आता त्याच्याकडे पूर्णवेळ कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
शांतोने आत्तापर्यंत 25 कसोटी सामने खेळले असून त्याने 5 शतकांसह 1449 धावा केल्या आहेत.
तसेच शांतोने 42 वनडे सामने खेळताना 2 शतकांसह 1202 धावा केल्या आहेत.
शांतोने 28 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 3 अर्धशतकांसह 602 धावा केल्या आहेत.