Sameer Amunekar
सागरी मार्गांचे रक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी बांधलेला जलदुर्ग पाहायचा असेल, तर वांद्रे किल्ला हे उत्तम उदाहरण आहे.
मध्य मुंबईतील वरळी आणि वांद्रे ही दोन टोके खेकड्याच्या नांगीसारखी अरबी समुद्रात पुढे आलेली असून, त्यामुळे हा परिसर संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता.
वांद्रे टोकाजवळून मिठी नदी अरबी समुद्राला मिळत असल्याने पूर्वी शत्रूंना या मार्गाने शहरात घुसखोरी करणे शक्य होते.
या धोक्याची जाणीव ठेवून पोर्तुगीजांनी वांद्रे लँड्सएंड परिसरात, तर इंग्रजांनी वरळी टोकावर किल्ले बांधले.
वांद्रे-वरळी या अर्धचंद्राच्या मध्यभागी पोर्तुगीज काळाच्या आधीपासून अस्तित्वात असलेला माहिम किल्ला आहे, जो या सागरी संरक्षण साखळीचा महत्त्वाचा भाग होता.
माहिम किल्ल्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व नुकसान झाले असले, तरी वरळी किल्ला आजही चांगल्या स्थितीत पाहायला मिळतो.
वांद्रे किल्ल्याच्या तटावर उभे राहिल्यावर वरळी आणि माहिम हे दोन्ही किल्ले दिसतात, तसेच जवळील बँडस्टँड परिसरातून समुद्रकिनारी फेरफटका मारता येतो; युद्धशास्त्रातील ‘स्ट्रॅटेजिक पॉईंट’चा प्रत्यक्ष अनुभव येथे मिळतो.