Sameer Amunekar
केळीच्या सालीमध्ये मुबलक प्रमाणात सिलिका असते, जे केसांना नैसर्गिक चमक देते. याच्या पाण्याने केस धुण्यामुळे केस मऊ आणि रेशमी होतात.
केळीच्या सालीच्या पाण्यात अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे टाळूवरील (Scalp) फ्री रॅडिकल्सशी लढतात.
केळीच्या सालीमध्ये बॅक्टेरियाविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म असतात. हे पाणी नियमित वापरल्याने टाळूची खाज कमी होते आणि कोंड्याची समस्या मुळापासून नष्ट होण्यास मदत होते.
या पाण्यातील पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी६ केसांच्या वाढीला चालना देतात. हे पाणी केसांच्या मुळांशी शोषले गेल्यावर रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केसांची लांबी वेगाने वाढण्यास मदत होते.
केळीच्या सालीचे पाणी केसांमधील ओलावा टिकवून धरते. कोरड्या आणि निर्जीव केसांमुळे केस मधूनच तुटण्याचे प्रमाण वाढते, अशा वेळी हे 'मॅजिक वॉटर' केसांना लवचिकता प्रदान करते.
केळीच्या साली रात्रभर एका काचेच्या बरणीत पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून घ्या आणि केस धुल्यानंतर शेवटचा 'रिन्स' म्हणून या पाण्याचा वापर करा. किंवा स्प्रे बॉटलमध्ये भरून टाळूवर स्प्रे करा.
ज्यांचे केस खूप पातळ आहेत, त्यांच्यासाठी हे पाणी उत्तम आहे. हे पाणी वापरल्याने केसांना एक प्रकारचा बाऊन्स आणि व्हॉल्यूम मिळतो, ज्यामुळे केस अधिक दाट आणि टवटवीत दिसतात.