Manish Jadhav
तुम्ही कधी केळीच्या सालीचा चहा (Banana Peel Tea) प्यायला आहे का? ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण ही कल्पना आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरु शकते.
केळीची साल अनेक पोषक तत्वांनी (Nutrients) परिपूर्ण असते, जी आपल्या शरीरासाठी महत्त्वाची आहे.
केळीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी12, मॅग्नेशियम, पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर यांसारखी अनेक पोषक तत्वे असतात.
केळीच्या सालीमध्ये ट्रिप्टोफॅन (Tryptophan) नावाचे अमिनो ॲसिड असते, जे सेरोटोनिन (Serotonin) आणि मेलाटोनिन (Melatonin) या हार्मोनच्या निर्मितीस मदत करते.
या चहामध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठता, गॅस आणि ऍसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम देते.
हा चहा वजन कमी करण्यातही उपयुक्त ठरतो.
पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे केळीच्या सालीचा चहा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
केळी आणि त्याच्या सालीमध्ये नैसर्गिक साखर असल्याने हा चहा शरीराला त्वरित ऊर्जा देऊ शकतो.