Beauty Face Pack: सुंदर आणि तजेलदार त्वचेचं रहस्य! 'हा' फेसपॅक बदलून टाकेल तुमच्या चेहऱ्याची चमक; रात्री झोपण्यापूर्वी वापरा ब्युटी पॅक

Manish Jadhav

कोरियन ग्लास स्किनचे रहस्य

कोरियन मुलींसारखी नितळ, कांती आणि आरशासारखी चमकणारी त्वचा हवी असेल, तर रात्री झोपण्यापूर्वी नॅचरल घटकांचा वापर करणे सर्वात उत्तम ठरते.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

केळी आणि मधाची जादू

केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, व्हिटॅमिन ए आणि सी असते, जे मधासोबत मिसळल्यास त्वचेला खोलवर पोषण आणि ओलावा मिळतो.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

फेसपॅक बनवण्याची सोपी पद्धत

एका बाऊलमध्ये पिकलेल्या केळीचा गर चांगल्या प्रकारे मॅश करुन घ्या आणि त्यात एक चमचा मध व थोडे दूध मिसळून घट्ट पेस्ट तयार करा.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

त्वचेला मिळतो इन्स्टंट ग्लो

हा घरगुती पॅक रात्री चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील निस्तेजपणा आणि थकवा दूर होऊन सकाळी चेहरा एखाद्या काचेसारखा चमकू लागतो.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

नैसर्गिक मॉइश्चरायझेशन

हा फेसपॅक कोरड्या आणि निर्जीव त्वचेसाठी वरदान ठरतो, कारण मध त्वचेतील ओलावा लॉक करुन त्वचा दिवसभर मऊ आणि मुलायम ठेवण्यास मदत करतो.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

सुरकुत्या आणि एजिंगपासून बचाव

केळीमधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेची लवचिकता टिकवून ठेवतात आणि वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर येणाऱ्या बारीक रेषा व सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

वापरण्याची योग्य पद्धत

रात्री चेहरा स्वच्छ धुवून हा पॅक 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा हलкया हाताने धुवून हलका मॉइश्चरायझर लावा.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

Purandar Fort | Dainik Gomantak
आणखी बघा