Pramod Yadav
गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे.
दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी पर्यटन आणि शिक्षण खात्यासंबधित मागण्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले.
मागण्या आणि कपात सूचनांच्या सत्रात सभागृहात पर्यटन खात्यासंबधित मागण्या केल्या.
सत्ताधारी भाजप घेऊन येत असलेले पर्यटन विधेयक वादात सापडले असताना विरोधी आमदारांनी त्यांची मते मांडली.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी याप्रकरणी बोलताना सनबर्न गोव्यातून हद्दपार करण्याची मागणी केली.
आलेमाव यांनी दक्षिण किंवा उत्तरेत कुठेच हा महोत्सव आयोजित केला जाऊ नये अशी मागणी केली.
सनबर्न महोत्सव राज्यात अमली पदार्थाच्या तस्करीला प्रोत्साहन देण्यासह, ड्रग कल्चर निर्माण करत असल्याचे आलेमाव म्हणाले.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी याबाबत उत्तर देताना आयोजकांकडून बेतूल येथे परवानगीबाबत प्रस्ताव आला आहे मात्र, अंतिम निर्णय झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिले.