Manish Jadhav
बाल्कनीच्या जमिनीवर सर्व कुंड्या ठेवण्यापेक्षा भिंतीवर रॅक्स लावा किंवा रेलिंगला अडकवता येणारे प्लँटर्स वापरा. यामुळे चालण्या-फिरण्यासाठी जागा मोकळी राहते.
तुमच्या बाल्कनीत किती वेळ ऊन येते, हे आधी पहा. ऊन कमी येत असेल तर मनी प्लांट, स्नेक प्लांट किंवा लकी बांबूसारखी सावलीत वाढणारी झाडे निवडा; ऊन चांगले येत असेल तर फुलझाडे किंवा मिरची-कोथिंबीरसारखी रोपे लावा.
खूप मोठ्या किंवा जड कुंड्यांऐवजी मध्यम आकाराच्या प्लास्टिक, ग्रो-बॅग्ज किंवा हलक्या कुंड्या घ्या. त्यामुळे त्या उचलणे आणि जागा बदलणे सोपे जाते.
कुंडीच्या तळाला पाणी साचून राहिले तर झाडांची मुळे कुजतात. त्यामुळे प्रत्येक कुंडीला खाली लहान छिद्र असणे गरजेचे आहे आणि त्यावर थोडे दगड किंवा खापराचा तुकडा ठेवा.
नुसती चिकट माती न वापरता त्यात थोडे कोकोपीट आणि शेणखत किंवा गांडूळखत मिसळा. हलक्या मातीमुळे मुळांना हवा खेळती राहते आणि झाडांची वाढ चांगली होते.
रोज गरजेपेक्षा जास्त पाणी घालू नका. कुंडीतील वरची माती कोरडी वाटल्यावरच पाणी द्या. शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी पाणी घालणे अधिक फायदेशीर ठरते.
वाळलेली पाने किंवा फांद्या वेळोवेळी काढून टाका. यामुळे झाड नीटस दिसते, कीड लागत नाही आणि नवीन पालवी फुटायला मदत होते.
Gardening Tips: गुलाबाला भरभरुन फुले हवीत? मग नवीन रोप लावताना 'या' चुका कधीच करु नका