Manish Jadhav
बाजीप्रभू देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक शूर सेनापती होते.
त्यांनी घोडखिंड (पावनखिंड) लढाईत पराक्रम गाजवला. या लढाईत त्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्दी जोहरच्या वेढ्यातून सुखरुप बाहेर काढले होते.
बाजीप्रभू देशपांडे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळात झाला होता. ते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू घराण्यातील होते.
बाजीप्रभू देशपांडे त्यांच्या अतुलनीय शौर्य आणि निष्ठेसाठी ओळखले जातात.
1660 मध्ये सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला होता. महाराज या वेढ्यातून निसटून विशाळगडाकडे जात असताना बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत (पावनखिंड) मराठा सैन्याचे नेतृत्व केले.
त्यांनी शत्रूंना रोखून धरले आणि महाराज विशाळगडावर सुखरुप पोहोचेपर्यंत झुंज दिली.
बाजीप्रभू देशपांडे यांनी या लढाईत आपल्या प्राणांची आहुती दिली.
त्यांच्या या बलिदानाने घोडखिंड पावन झाली, म्हणूनच तिचे नाव 'पावनखिंड' असे पडले, अशी इतिहासात नोंद आहे.
बाजीप्रभू आणि त्यांचे बंधू फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे, असे इतिहासात नमूद आहे.