Manish Jadhav
राजमाता जिजाऊ या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री.
त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणूनही संबोधले जाते.
सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाऊंचे वडील आणि आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.
डिसेंबर 1605 मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या.
राजमाता जिजाऊंनी महाराजांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धा बनवले.
महाराजांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीती शिकवली. याशिवाय, समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडसही दिले.
मात्र, 17 जून 1674 रोजी किल्ले रायगडाजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले. तेव्हा महाराजांच्या राज्याभिषेकाला अवघे बारा दिवस झाले होते.