Akshata Chhatre
बाबा वेंगा यांचा जन्म १९११ मध्ये बल्गेरियात झाला होता. त्यांचे मूळ नाव व्हँजेलिया पांडेवा गुश्तेरोवा होते. त्या एक अंध महिला भविष्यवक्ता होत्या.
बाबा वेंगा यांनी २०२५ साठी काही भयानक भाकिते केली आहेत. त्यामध्ये जागतिक मंदी, महायुद्ध, आणि नैसर्गिक आपत्ती यांचा समावेश आहे.
मात्र याच वर्षासाठी त्यांनी एक सकारात्मक भाकित देखील केलं आहे. त्यानुसार २०२५ हे वर्ष काही विशिष्ट राशींसाठी खूपच भाग्यशाली ठरणार आहे.
बाबा वेंगा यांच्या मते, मेष राशीसाठी २०२५ हे वर्ष यशाच्या पायऱ्या चढवणारं ठरेल. ज्या गोष्टींना तुम्ही सुरुवात कराल, त्या यशस्वी होतील. नोकरीत प्रगती, पदोन्नती, आणि आर्थिक स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे.
सिंह राशीसाठी २०२५ सुखदायक आणि समाधानकारक असेल. मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायात वाढ होईल आणि नवीन संधी उपलब्ध होतील
कुंभ राशीच्या लोकांसाठीही हे वर्ष अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. आत्मविश्वासात वाढ होईल, कामात नावीन्यता येईल आणि तुमच्या कौशल्याचं कौतुक होईल. प्रमोशनच्या संधी निर्माण होतील.