Akshata Chhatre
आयुष मंत्रालयानुसार, थंडीत गोड, आंबट आणि खारट पदार्थांचे सेवन करावे. या चवी शरीराला नैसर्गिक उब देतात आणि ऊर्जा टिकवून ठेवतात.
हाडे मजबूत करण्यासाठी आणि थंडीशी लढण्यासाठी आहारात दूध, दही आणि तूप यांचा समावेश करा. हे पदार्थ शरीराला आतून ताकद देतात.
हिवाळ्यात दररोज मोहरी किंवा तीळ तेलाने शरीराला मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.
हिवाळ्यात शरीराला अधिक उष्मांकाची गरज असते. त्यामुळे हलका आहार घेण्याऐवजी पौष्टिक आणि संतुलित जेवण करण्यावर भर द्या.
सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात मध टाकून प्या. यामुळे शरीर डिटॉक्स होते, पचन सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
शरीर सक्रिय ठेवण्यासाठी दररोज सकाळी हलका व्यायाम करा आणि सर्दी-खोकल्यापासून वाचण्यासाठी वाफ घेणे फायदेशीर ठरते.
थंडीत जास्त तिखट खाणे टाळा, थंड पाणी पिऊ नका, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवसात चुकूनही उपवास करू नका.