Akshata Chhatre
मॉन्सून आल्यानंतर आपल्याला हिरवाई, गारवा आणि निसर्गाचं सौंदर्य नक्कीच आवडतं, पण हाच पाऊस आपल्या आरोग्यासाठी मोठा धोका ठरतोय असं म्हणावं लागेल.
कारण संशोधन सांगतं की पावसातली ओली माती, वाढलेलं प्रदूषण आणि दूषित अन्न-पाण्यामुळे शरीरात हानीकारक जिवाणू शिरतात आणि त्यामुळे सर्दी, ताप, कफ, जुलाब, त्वचेसंबंधी विकार अशा आजारांचा धोका वाढतो.
आयुर्वेदात या सगळ्याचं स्पष्टीकरण त्रिदोष सिद्धांतात आढळतं – वात, पित्त आणि कफ हे शरीरातील तीन प्रमुख दोष, जे संतुलित असतील तर हवामान कितीही बदललं तरी आरोग्य उत्तम राहतं.
पावसाळ्यात विशेषत: वात आणि कफ वाढतात, त्यामुळे सर्दी, खोकला, अपचन, सांधेदुखी, थकवा अशा तक्रारी वाढतात.
त्रिदोषांचं संतुलन राखण्यासाठी काही सोप्या नैसर्गिक उपायांचा अवलंब करता येतो. दररोज सकाळी उपाशीपोटी हरसिंगार, निरगुंडी किंवा कोरफड (एलोवेरा) रस घेणं हे शरीरातील दोष कमी करतं.
पावसाळ्यात हलका, उष्णतेचा आहार घ्या जसं की तूप, आले, हळद, लसूण यांचा नियमित वापर करा. कच्च्या पालेभाज्या, थंड पाणी, फास्ट फूड टाळा.
रोज सकाळी हलका व्यायाम, योग, प्राणायाम आणि ध्यान करा यामुळे मन शांत राहतं आणि त्रिदोष नैसर्गिकरित्या संतुलित राहतात. झोप व्यवस्थित घ्या आणि रात्री उशिरा जागरण टाळा.