Akshata Chhatre
उन्हाळ्यात घाम, सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे केस गळणे, तुटणे आणि वाढ थांबणे यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात.
पुरुष आणि महिला दोघेही या समस्यांनी त्रस्त होतात आणि त्यावर उपाय म्हणून अनेकदा महागडी केमिकलयुक्त उत्पादने वापरतात, पण तरीही समाधान मिळत नाही.
प्रसिद्ध हेअर स्पेशालिस्ट जावेद हबीब यांनी सांगितलेल्या एका घरगुती उपायानुसार, नारळ तेलात आले पावडर मिसळून लावल्याने केसांना पोषण मिळते आणि केसांची वाढ जलद होते.
यासाठी ४ टेबलस्पून नारळ तेलात २ टेबलस्पून आले पावडर घालून चांगलं मिसळा. पावडर नसेल तर ताजं आले वाटून वापरू शकता. हे मिश्रण महिन्यातून दोनदा टाळूवर लावा आणि १० मिनिटांनी केस सौम्य शाम्पूने धुवा.
आल्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म टाळूवरील कोंडा कमी करतात, खाज कमी करतात आणि टाळूमधील रक्ताभिसरण वाढवून केसांच्या वाढीला चालना देतात.
नारळ तेलात इतर नैसर्गिक घटक मिसळून केसांना अधिक पोषण देता येतं. उदाहरणार्थ, नारळ तेलात कढीपत्ता, कांद्याचा रस आणि मेथी मिसळून तयार केलेलं तेल केसांना लांब, दाट आणि मजबूत बनवतं.