गोमन्तक डिजिटल टीम
भारतात कैक वर्षांपासून वापरला जाणारा वैद्यकीय प्रकार म्हणजे आयुर्वेद.
आयुर्वेदात भगवान धन्वंतरीला आदराचं स्थान दिलं जातं, धन्वंतरी हा देवांचा वैद्य आहे.
अगदी ग्रंथ आणि पुराणांमध्ये देखील आपल्याला आयुर्वेदाचे दाखले बघायला मिळतात.
आयुर्वेदात चिकित्सकाला डॉक्टर नाही तर वैद्य असं म्हटलं जातं.
BAMS ची पदवी मिळवल्यानंतर काही विद्यार्थी MD आणि PhD पर्यंत शिक्षण घेतात.
आयुर्वेदात वात, कफ आणि पित्त या तीन दोषांच्या आधारे निदान केलं जातं, म्हणूनच इथे नाडी परीक्षेला सुद्धा महत्व आहे.
पंचकर्म या प्रकारात नस्य, बस्ती, वमन, विरेचन, अग्निकर्म अशा प्रकारांचा समावेश होतो.