Sameer Amunekar
अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीच्या अभिषेक सोहळ्याच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्याला शनिवारी प्रारंभ झाला.
मोठ्या संख्येने भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी पवित्र नगरीत दाखल झाले. राम मंदिर भारतीय संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचे प्रतीक आहे.
शनिवारपासून राममंदिर परिसरात तीन दिवसीय धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
शरयू नदीच्या किनाऱ्यापासून राम मंदिरपर्यंतचा परिसर फुलांनी सजविण्यात आला आहे.
देशभरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि सामान्य लोक भगवान रामाचे दर्शन घेण्यासाठी आणि समारंभात सहभागी होत आहेत.
राम मंदिराचे फोटो भाविकांच्या मनाला भुरळ घालत आहेत. या फोटोंमध्ये मंदिराची भव्यता आणि सौंदर्य स्पष्टपणे दिसून येते.