आरोग्याचा अनेक फायदे देणाऱ्या आवळ्याविषयी जाणून घ्या...

Rahul sadolikar

आवळ्याचे शास्त्रीय नाव

आमला, अंबाल क. अमलका सं. आदिफल, अम्लिका इं. एंब्लिक मायरोबलान लॅ. एंब्लिका ऑफिसिनॅलिस कुल-यूफोर्बिएसी). हा मध्यम आकाराचा (९-१२ मी. उंच) पानझडी वृक्ष भारतात सर्वत्र व उष्ण कटिबंधात आणि उपोष्ण कटिबंधातील जंगलांत वाढतो किंवा त्याची लागवड करतात श्रीलंका, चीन व मलाया येथेही तो आढळतो.

Indian Gooseberry | Dainik Gomantak

आवळ्याच्या बिया

बी एकच व त्रिधारी ऑक्टोबर ते फेब्रुवारीत फळे पिकतात. फळ तुरट, शीतल, मूत्रल (लघवी वाढविणारे) व सारक वाळलेली फळे (आवळकाठी) अतिसार, रक्तस्राव व आमांश यांवर उपयुक्त लोहाबरोबर ही फळे कावीळ, रक्तक्षय, अग्निमांद्य इत्यादींवर देतात

Indian Gooseberry | Dainik Gomantak

आवळ्याची फुले

फुले थंड व सारक मूळ आणि साल तुरट बिया दमा, श्वसन नलिका दाह व पित्ताधिक्यावर उपयुक्त फळात  जीवनसत्त्व भरपूर व ते स्कर्व्ही या विकारावर गुणकारी असते.

Indian Gooseberry | Dainik Gomantak

आवळ्याचा वापर

सालीत, पानात व फळात टॅनीन भरपूर असते. त्याचा उपयोग चामडी कमाविण्यास होतो. आवळा (फळ) उपयुक्त खाद्य आहे. त्यापासून लोणचे, वडी, मुरंबा (मोरावळा), सुपारी इ. करतात. इमारतीच्या बांधकामात किरकोळ उपयोगासाठी लाकूड वापरतात शेतीची अवजारे व सरपण यांसाठीही उपयुक्त. पाला व फळे जनावरे खातात. पानांपासून तपकिरी पिवळे रंगद्रव्य निघते. हिंदुधर्मात आवळा पूजनीय मानला जातो.

Indian Gooseberry | Dainik Gomantak

आवळ्याचा औषधी प्रसार

आवळ्याचा औषधीचा प्रसार सर्व भारतात आणि श्रीलंकेत व ऑस्ट्रेलियाशिवाय उष्ण कटिबंधातील इतर देशांत आहे. कोकणात व दक्षिणेत पिकामध्ये तणासारखी वाढते.

Indian Gooseberry | Dainik Gomantak

पाने दोन रांगांत

पाने अनेक, दोन रांगांत, दीर्घवृत्ताकृती व लहान फुले विपुल, कक्षास्थ (बगलेत), एकलिंगी, पिवळट एकाच झाडावर जुलै-ऑगस्टमध्ये येतात पुं-पुष्पे १-३, स्त्री-पुष्पे एकाकी बिंब दोन्ही फुलांत फळ (बोंड) फार लहान व बिया तीन असतात. मुळे काविळीवर, पाने व मुळांचे चूर्ण गळवे व व्रण यांवर गुणकारी पाने दीपक (भूक वाढविणारी) चीक जखमांवर लावतात.

Indian Gooseberry | Dainik Gomantak

आरोग्य आणि आवळा

रोज एक आवळा खाल्ल्याने आरोग्य सुधारुन शरीर निरोगी राहण्यास मदत राहते.

Indian Gooseberry | Dainik Gomantak

झाडावर सुतारकाम करणाऱ्या या पक्ष्याविषयी माहितेय का?

Woodpeacker | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी