Akshata Chhatre
आजची जीवनशैली, रासायनिक उत्पादने आणि हवामान बदल यांचा आपल्या आरोग्यासोबतच केसांवरही वाईट परिणाम होतो.
आहारात सुधारणा करण्यासोबतच या सवयी तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.
दररोज टाळूची मालिश करताना तेल वापरणे अधिक चांगले केल्याने केसांमधील रक्त परिसंचरण सुधारते.
अनेकदा फॅशनमुळे आपण विविध प्रकारच्या घट्ट हेअरस्टाईल्स करतो, ज्यामुळे केस ओढले जातात आणि कमजोर होतात. यामुळे केस तुटण्याचे प्रमाण वाढते.
ज्याप्रमाणे उन्हामुळे त्वचेवर टॅन येतो, त्याचप्रमाणे सूर्याची हानिकारक किरणे केसांसाठीही नुकसानदायक असतात. उन्हाळ्यातील कडक ऊन केसांना निर्जीव, रूक्ष आणि खराब बनवते.
लाकडी कंगवा केसांसाठी सर्वात चांगला असतो. यामुळे टाळूमध्ये रक्त परिसंचरण चांगले होते आणि केसांच्या वाढीसाठी मदत मिळते.
तुम्ही या सोप्या सवयी तुमच्या हेअर केअर रूटीनमध्ये सामील करून तुमचे केस सुंदर आणि निरोगी ठेवू शकता.