Akshata Chhatre
आजकाल लोक वेळ वाचवण्यासाठी जीवनशैलीत अनेक हानिकारक गोष्टींचा समावेश करतात.
बाजारात मिळणारी 'इंस्टंट मेहंदी' त्वचेसाठी अत्यंत धोकादायक आहे, कारण ती केवळ १० मिनिटांत गडद रंग देते.
या मेहंदीमध्ये PPD आणि पिक्रॅमेट सारखे रासायनिक घटक वापरले जातात, जे रंगाला गडद करतात.
हेच केमिकल्स हेअर डाईमध्ये वापरले जातात. FDA नुसार हे केमिकल्स थेट त्वचेवर लावणे धोकादायक आहे.
हे घटक त्वचेतून रक्तात मिसळून त्वचेची ॲलर्जी, जळजळ आणि अनेक ऑटोइम्यून आजार वाढवू शकतात.
बाजारातील केमिकल्स टाळण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरातील फक्त ४ गोष्टी वापरून घरीच नैसर्गिक मेहंदी बनवू शकता; चहा,साखर, तांदळाचे पीठ/मक्याचे पीठ, कॉफी.
एका पॅनमध्ये चहा आणि साखर एकत्र करून मंद आचेवर थोडावेळ गरम करा. एका वाटीत तांदळाचे/मक्याचे पीठ आणि कॉफी पावडर एकत्र घ्या. यात तयार केलेले चहाच्या पाण्याचे मिश्रण आवश्यकतेनुसार मिसळून एक जाडसर पेस्ट तयार करा.