Manish Jadhav
दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज मॅथ्यू ब्रीत्झकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 88 धावांची शानदार खेळी खेळली.
या खेळीसह ब्रीत्झकेने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला.
मॅथ्यू ब्रीत्झके हा आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिल्या चार डावांमध्ये प्रत्येकी 50 पेक्षा अधिक धावा करणारा जगातील एकमेव फलंदाज बनला.
ब्रीत्झकेने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानच्या भूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने 150 धावांची जबरदस्त खेळी साकारुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
त्यानंतर त्याने पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 83 धावांची अर्धशतकी खेळी खेळली होती.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 57 धावांची खेळी खेळली.
आता चौथ्या एकदिवसीय सामन्यात 88 धावा करुन त्याने आपल्या पहिल्या चार डावांत 50+ धावा करण्याचा विश्वविक्रम पूर्ण केला.