Pranali Kodre
11 फेब्रुवारी रोजी 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेचे विजेतेपद ऑस्ट्रेलिया संघाने पटकावले.
ऑस्ट्रेलियाने बेनेनीला झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला 79 धावांनी पराभूत करत चौथ्यांदा 19 वर्षांखालील वर्ल्डकपवर नाव कोरले.
दरम्यान ऑस्ट्रेलियाने गेल्यावर्षभरात म्हणजेत खरंतर गेल्या 9 महिन्यात भारतीय संघाला आयसीसीच्या अंतिम सामन्यात पराभूत करण्याची ही तिसरी वेळ आहे.
यापूर्वी या दोन देशांचे वरिष्ठ संघ जून 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आणि नोव्हेंबर 2023 मध्ये वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमने-सामने आले होते.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला 209 धावांनी पराभूत केले होते.
तसेच वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पॅट कमिन्सच्याच नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभूत केले होते.
त्यामुळे ऑस्ट्रेलियाने आयसीसीच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभूत करत विजेतेपदाची हॅट्रिक साधली आहे.