Sameer Amunekar
भारताच्या इतिहासातील सर्वात क्रूर आणि धर्मांध सम्राट म्हणून ओळखला जाणारा औरंगजेब पहिल्याच नजरेत एका दासीच्या प्रेमात पडला होता.
औरंगजेबाला दुसऱ्यांदा दख्खनचा गव्हर्नर म्हणून नियुक्त केलं होतं. औरंगाबादला जाताना तो बुऱ्हाणपूरमध्ये मावशीला भेटण्यासाठी आला. तिथेच हिराबाईची पहिली भेट.
बुऱ्हाणपूरातील जैनाबादच्या आहूखाना बागेत फिरत असताना औरंगजेबाने हिराबाईला पाहिलं. ती अप्रतिम सुंदर आणि सुरेल आवाजाची गायिका होती.
मावशीच्या रागावण्यामुळे हिराबाईने औरंगजेबाकडे कटाक्ष टाकला. त्या क्षणीच औरंगजेब तिच्या प्रेमात हरवला.
‘मसर-अल-उमारा’ या पुस्तकात नवाब शम्स-उद-दौला आणि अब्दुल हयी खान यांनी या घटनेचा उल्लेख केला आहे. हमीदुद्दीन खान यांनीही औरंगजेबाच्या चरित्रात ही घटना लिहिली आहे.
कथेप्रमाणे, हिराबाईला पाहताच औरंगजेब इतका मोहून गेला की तिथेच बेशुद्ध पडला. ही बातमी मावशीपर्यंत पोहोचली आणि ती धावत आली.
काही तासांनंतर औरंगजेबाला शुद्ध आली, पण हिराबाईबद्दलचं त्याचं आकर्षण कायम राहिलं. ही कहाणी आजही इतिहासात एक अद्भुत आणि गुपित प्रेमप्रसंग म्हणून ओळखली जाते.