Sameer Amunekar
झोपण्यापूर्वी मुलांना काही विशिष्ट गोष्टी देणे टाळले पाहिजे कारण त्याचा त्यांच्या झोपेवर, आरोग्यावर आणि वागणुकीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
साखरयुक्त पदार्थांमुळे मुलांची ऊर्जा अचानक वाढते, आणि त्यामुळे त्यांना झोप लागायला उशीर होतो. उदाहरण: चॉकलेट, मिठाई, बिस्किटे, साखर मिसळलेले दूध.
कॅफिन हे उत्तेजक आहे. त्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते. उदाहरण: कोल्ड ड्रिंक्स, चॉकलेट, काही वेळा चहा/कॉफी.
झोपण्याच्या अगदी आधी जड जेवण केल्यास पचनावर ताण येतो, आणि त्यामुळे झोप नीट लागत नाही. उदाहरण: तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ.
स्क्रीनमधून येणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे मेंदू सतर्क राहतो आणि झोप येण्यास अडथळा होतो. झोपण्याच्या किमान ३०-६० मिनिटं आधी स्क्रीन बंद करावी.
भीतीदायक गोष्टी ऐकल्यास किंवा पाहिल्यास (जसे की घाबरणाऱ्या गोष्टींच्या कथा) मुलांना दुःस्वप्ने पडू शकतात. रात्री शांत, गोड गोष्टी ऐकवाव्यात.