Sameer Amunekar
तुमचा ATM पिन, UPI पासवर्ड, नेट बँकिंग डिटेल्स, क्रेडिट कार्ड नंबर – ही माहिती कोणालाही देऊ नका. फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते.
आधार क्रमांक, त्यावरील डिटेल्स किंवा कोणताही OTP कोणाशीही शेअर करू नका, जरी तो जवळचा माणूस असला तरी.
सोशल मीडिया हॅक होऊन तुमच्या नावाने गैरवापर होऊ शकतो. म्हणून पासवर्ड नेहमी सुरक्षित ठेवा.
रिलेशनशीप, कुटुंबातील वाद यासारख्या गोष्टी प्रत्येकाला सांगू नका. चुकीच्या व्यक्तीकडे ही माहिती गेल्यास गैरफायदा घेतला जाऊ शकतो.
काही आरोग्यविषयक गोष्टी वैयक्तिक असतात. त्या सगळ्यांपाशी शेअर केल्यास अपमान किंवा टीका होऊ शकते.
कोणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवून माहिती दिली असेल, तर ती तिसऱ्या व्यक्तीला सांगू नका. तुमच्यावरचा विश्वास तुटू शकतो.
काही वेळा आपण कोणाशी योजना शेअर करतो आणि ती अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचते. म्हणून, कृती होईपर्यंत शांत राहणेच योग्य.