Akshata Chhatre
सण आला की घरात गोडधोड करण्याचा उत्साह असतो. होळीचा सण जवळ आलाय म्हणजे पुरणपोळीची तयारी सुरु झालीच असेल.
हरभऱ्याची डाळ - १ कप
गूळ - १ कप
वेलची पूड - १ टीस्पून
मैदा - २ कप
हळद, मीठ
तूप
सर्वात आधी हरभऱ्याची डाळ शिवून घ्या. ती मऊसर झाली की त्यात गूळ घाला. मंद आचेवर ढवळत राहा, तोपर्यंत घरभर गोडसर सुवास पसरेल.
त्यानंतर मैदा, हळद, मीठ, आणि थोडं तेल घालून मऊसर कणिक मळून घ्या. "कणिक जितकी मऊ, पोळी तितकी स्वादिष्ट," असं म्हणतात.
पुरणाच्या कणकेचे छोटे गोळे बनवा आणि हलक्या हाताने पोळी लाटा.
गरम तव्यावर पोळी टाका, वर तूप सोडा. पोळीला छान सोनेरी रंग आला आणि तव्यावरून खमंग वास सुटला की समजा पोळी तयार आहे.