Atal Bihari Vajpayee: ''तुम्ही मित्र बदलू शकता, शेजारी नाही''

Manish Jadhav

अटल बिहारी वाजपेयी

अटल बिहारी वाजपेयी (25 डिसेंबर 1924 - 16 ऑगस्ट 2018) यांचा जन्म दिवस (25 डिसेंबर) हा सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. ते एक प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्व होते. चला तर मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊया...

Atal Bihari Vajpayee | Dainik Gomantak

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात

अटलजींसाठी मराठी मधील एक म्हण अगदी चपखल बसते. 'मुलाच्या पायाला पाळण्यात दिसतात.' अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांनी आधीच त्यांच्या पंतप्रधान होण्याची भविष्यवाणी केली होती.

Atal Bihari Vajpayee | Dainik Gomantak

पंडित नेहरु अटलजींची ओळख करुन देताना

पंडित नेहरुंनी एका परदेशी पाहुण्याशी वाजपेयींची ओळख करुन देताना एकदा सांगितले होते की, 'हा तरुण एक दिवस देशाचा पंतप्रधान बनेल.'

Atal Bihari Vajpayee | Dainik Gomantak

लालकृष्ण अडवाणींनी आत्मचरित्रात लिहिले

अडवाणी यांनी 'मेरा देश मेरा जीवन' या आपल्या आत्मचरित्रात लिहिले - मला वाटले की, ते एक नशीबवान आणि दिग्गज नेते होते, ज्यांनी एक दिवस भारताचे नेतृत्व केले पाहिजे.

Atal Bihari Vajpayee | Dainik Gomantak

नेहरुंच्या मंत्रिमडळातील सहकारी म्हणाले...

मे 1980 मध्ये मुंबईत झालेल्या भाजपच्या पहिल्या परिषदेत प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि नेहरु मंत्रिमंडळातील मंत्री मोहम्मद अनी करीमभाई यांनीही आपल्या भाषणात म्हटले होते की, एक दिवस वाजपेयी नक्कीच भारताचे पंतप्रधान होतील.

Atal Bihari Vajpayee | Dainik Gomantak

बालेकिल्ल्यातून निवडणूक लढवणार नाही

माधवराव सिंदिया यांनी वाजपेयींचा नाट्यमयरित्या पराभव केला होता. त्यानंतर आपण बालेकिल्ल्यातून निवडणूक लढवणार नसल्याचे वाजपेयी म्हणाले होते.

Atal Bihari Vajpayee | Dainik Gomantak

UN मधील अटलजींचे भाषण गाजले

4 ऑक्टोबर 1977 रोजी वाजपेयी परराष्ट्र मंत्री म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या 32 व्या अधिवेशनात सहभागी झाले होते. आपल्या भाषणात वाजपेयी म्हणाले होते की, 'मी भारतीय जनतेच्या वतीने लीग ऑफ नेशन्ससाठी शुभेच्छांचा संदेश घेऊन आलो आहे. मला भारताच्या लीग ऑफ नेशन्सवरील विश्वासाची पुष्टी करायची आहे...'

Atal Bihari Vajpayee | Dainik Gomantak

जेव्हा शिखांना वाचवण्यासाठी पुढे आले

शीख दंगलीच्या काळात राजधानी दिल्लीत अराजकता माजली होती तेव्हा वाजपेयींनी स्थानिक नेते मदनलाल खुराना आणि विजय कुमार मल्होत्रा ​​यांना शिखांची आणि त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवली होती.

Atal Bihari Vajpayee | Dainik Gomantak

''तुम्ही मित्र बदलू शकता, शेजारी नाही''

आपण जीवनामध्ये मित्र बदलू शकतो मात्र शेजारी नाही, असे वाजपेयी म्हणाले होते.

Atal Bihari Vajpayee | Dainik Gomantak

वाजपेयींची राजकीय कारकीर्द

• वाजपेयी 47 वर्षे खासदार होते. • अटलजींनी तीन वेळा पंतप्रधानपद भूषवले. • ते लोकसभेवर 9 वेळा आणि 2 वेळा राज्यसभेवर निवडून आले होते. • 1957, बलरामपुरा येथून वयाच्या 33 व्या वर्षी वाजपेयी पहिल्यांदा संसदेत गेले.

Atal Bihari Vajpayee | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी