Asirgarh Fort: महाभारतातील अश्वत्थामाचा 5000 वर्षांपासूनचा मुक्काम, मेंढपाळ राजानं उभारला 'असीगरड'; सातपुड्यातील गौरवशाली इतिहास

Manish Jadhav

असीरगड किल्ला

असीरगड किल्ल्याला 'दक्षिणचे प्रवेशद्वार' किंवा 'दख्खनची गुरुकिल्ली' म्हटले जायचे. ज्याचे या किल्ल्यावर नियंत्रण, त्याचे संपूर्ण दक्षिण भारतावर वर्चस्व प्रस्थापित होत असे.

Asirgarh Fort | Dainik Gomantak

अभेद्य आणि अजिंक्य किल्ला

सातपुडा पर्वत रांगांवर, समुद्रसपाटीपासून सुमारे 2592 फूट उंचावर वसलेला हा किल्ला त्याच्या भौगोलिक रचनेमुळे शत्रूसाठी पूर्णपणे अभेद्य आणि जिंकण्यास कठीण होता.

Asirgarh Fort | Dainik Gomantak

आशा अहीर राजाचा इतिहास

या किल्ल्याची निर्मिती 14व्या शतकाच्या सुरुवातीला 'आसा अहीर' नावाच्या एका मेंढपाळ राजाने केली होती. त्याच्याच नावावरुन या किल्ल्याला 'असीरगड' हे नाव मिळाले.

Asirgarh Fort | Dainik Gomantak

अकबराची शेवटची ऐतिहासिक मोहीम

मुघल सम्राट अकबराच्या आयुष्यातील ही शेवटची लष्करी मोहीम होती. 1601 मध्ये अकबराने हा किल्ला जिंकण्यासाठी जंगजंग पछाडले होते आणि शेवटी लाच देऊन फितुरीने हा किल्ला ताब्यात घेतला.

Asirgarh Fort | Dainik Gomantak

सोन्याच्या चाव्यांनी उघडले दरवाजे!

अकबरालाही हा किल्ला युद्धाने जिंकता आला नाही, अशी इतिहासात नोंद आहे. त्याने किल्ल्याचे दरवाजे उघडण्यासाठी 'सोन्याच्या चाव्यांचा' वापर केला होता, अशी कथा प्रसिद्ध आहे.

Asirgarh Fort | Dainik Gomantak

महाभारतातील अश्वत्थामाचे रहस्य

या किल्ल्यात एक प्राचीन शिवमंदिर आहे. स्थानिक मान्यतेनुसार, महाभारतातील अमर पात्र 'अश्वत्थामा' आजही दररोज पहाटे या मंदिरात येऊन भगवान शिवाची पूजा करतो आणि गुलाबाचे फूल वाहतो.

Asirgarh Fort | Dainik Gomantak

मराठा साम्राज्य आणि इंग्रजांचे नियंत्रण

उत्तर काळात या किल्ल्यावर मराठ्यांचे वर्चस्व होते. मात्र, 1899 मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव करुन या धोरणात्मक किल्ल्यावर आपले नियंत्रण मिळवले.

Asirgarh Fort | Dainik Gomantak

Fort History: शेषनागाचा भाऊ आणि राक्षसांचा संहार...! शूर राजपूत योद्ध्यांनी कसा राखला 'या' किल्ल्याचा बाणा? 300 वर्षांचा रक्तरंजित इतिहास

आणखी बघा